Wednesday, July 15, 2026
Homeभंडारादुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेजण पडले वैनगंगा नदीत..

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेजण पडले वैनगंगा नदीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-दुचाकीने कार्यालयात जाण्यासाठी निघाले, पण वैनगंगा नदीच्या पुलावरून जात असतांना अचानकपणे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही थेट नदीत पडले.मात्र,नदी पात्रात आंघोळीसाठी आलेल्या उपस्थित नागरिकांनी दोघांचेही प्राण वाचविल्याची घटना आज,शनिवार १९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील रहिवासी सुकराम फसाटे व जितेंद्र सपाटे यांच्या बाबतीत घडली.हे दोघेही भंडारा जिल्हा दूध संघाचे कर्मचारी असून आज सकाळच्या सुमारास भंडारा येथे कार्यालयात जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते.वैनगंगेवरील जुन्या पुलावरुन जात असतांना  त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह दोघेही थेट नदीत पडले.पुलावरून जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर नदीवर आंघोळीसाठी गेलेले तैराकी मित्र मंडळाच्या काही सदस्यांनी धाव घेत नदीत उडी मारली.उर्वरित सदस्यांनी नजीकच्या हनुमान मंदिरात ठेवलेली दोरी व लाईफ जॅकेट घेऊन पाण्यात फेकले.दोघांनाही लाईफ जॅकेट पाण्यातच घालून देण्यात आले.त्यानंतर दोघांनाही नदीतून बाहेर काढण्यात आले.नशीब बलवत्तर म्हणून दोघेही तैराकी मित्र मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने बचावले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!