Wednesday, July 15, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा सतीनदी पुलाचा पोचमार्ग धोकादायक; मजबुतीकरणासह उपाययोजना करण्याची मागणी.. - माजी नगराध्यक्ष...

कुरखेडा सतीनदी पुलाचा पोचमार्ग धोकादायक; मजबुतीकरणासह उपाययोजना करण्याची मागणी.. – माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे यांचेसह विवेक निरंकारींनी केली प्रत्यक्ष पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-तब्बल तीन महिन्याच्या  प्रतिक्षेनंतर कुरखेडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सतीनदीच्या निर्माणाधीन पुलावरून दुचाकी वाहनांची तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू झाली आहे. मात्र,येथील तात्पूरत्या स्वरूपात बांधण्यात आलेला पोचमार्ग हा मातीच्या तिव्र उताराचा व कमी रूंदीचा असल्याने वाहनधारकांसाठी धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे पोचमार्गावरील उतार लांबीसह रूंद करून त्यावर गीट्टी पिचींग करीत मजबुतीकरण करण्यात यावे, अशी मागणी आज,बुधवार २४ सप्टेंबर रोजी सती नदीवरील पुलाची प्रत्यक्ष पाहणी दरम्यान कुरखेडा नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे यांचेसह कुरखेडा उपजिल्हा रुग्ण कल्याण समीतीचे सदस्य विवेक निरंकारी यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग कुरखेडा ते कोरची दरम्यानच्या कुरखेडा सतीनदीवरील निर्माणाधीन पुलाच्या बांधकामामुळे जवळपास तीन महिण्यापासून येथील वाहतूक ठप्प असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना तालुका मुख्यालय गाठण्याकरीता कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला.यासाठी तब्बल १५ ते २० कीलोमीटर अंतरावरील फेरा असलेल्या मालदूगी-वाघेडा-आंधळी मार्गे असलेल्या खडतर व खड्डेमय रस्त्याने त्रासदायक प्रवास करावा लागत होता.त्यामुळे निर्माणाधीन पुलाच्या स्लॅबचे बांधकाम होताच मातीचा तिव्र उतार असतांनाही दुचाकी चालकांची या मार्गावर रिघ लागलेली आहे.उताराच्या बाजूला खोल खंदक असल्याने एखादे दुचाकी वाहन घसरून एखाद्याच्या
जीवितास हानी पोहचू शकते.सदर पोचमार्ग तात्पूरत्या स्वरूपात बांधण्यात आलेला असला तरी तिव्र उताराची लांबी वाढवत उतार कमी करण्यात यावा,उताराची रूंदी वाढविण्यात यावी,मजबूतीकरणाकरीता जेएसबी गिट्टीची पीचीग करण्यात यावी व येथील धोकादायक प्रवास टाळण्यात यावा व तातडीने पोचमार्गाचे बांधकाम पूर्ण करीत येथील जडवाहतूक पूर्ववत सूरू होईल याची काळजी घ्यावी,अशी मागणी भाजपा जिल्हामहामंत्री तथा माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे व किराणा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तथा रुग्ण कल्याण समीतीचे सदस्य विवेक निरंकारी यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!