Wednesday, June 10, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा शहर विचार मंचासह नागरिकांच्या वतीने नागपूर बस चालक तथा वाहकाचा सत्कार..

कुरखेडा शहर विचार मंचासह नागरिकांच्या वतीने नागपूर बस चालक तथा वाहकाचा सत्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-बऱ्याच कालावधीपासून बंद असलेली कुरखेडा ते नागपूर बस अखेर कुरखेडा- कोरची मार्गावरून धावू लागल्याने परिसरातील प्रवाशांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अश्यातच विविध उपक्रमांसाठी प्रख्यात असलेल्या कुरखेडा शहर विचार मंचासह नागरिकांच्या वतीने आज,रविवार ८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास कुरखेडा बसस्थानक परिसरात बहु प्रतीक्षेतील नागपूर बसची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली.यावेळी बसचालक व वाहकाचा दुपट्टा,श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच पेढा भरवत सत्कार करण्यात आला.
मागील जवळपास सहा वर्षापासून कोरची,कुरखेडा ते थेट नागपूर ही महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती.कोरोना कालावधी लोटूनही सदरची बससेवा पूर्ववत सूरू करण्यात न आल्याने परिसरातील विशेषतः वयोवृद्ध व महिला प्रवाश्यांना नागपूरकरीता तुटक-तुटक शारिरीक त्रासदायक प्रवास करावा लागत होता.यासंदर्भात अनेकदा शहर विचार मंचाच्या वतीने स्थानिक बस स्थानक प्रमूख श्रीधर शिवणकर यांच्या मार्फत पाठपूरावा करण्यात येत होता.तसेच नुकतेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थीत महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत कोरची,कुरखेडा ते नागपूर ही थेट बस सेवा व कुरखेडा येथे बस आगाराच्या बांधकामाची मागणी प्रभावीपणे मांडली होती.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत कोरची-नागपूर व कुरखेडा-नागपूर या दोन बस फेऱ्या सुरू करण्यात आल्याने शहर विचार मंचाने महामंडळ व आमदार मसराम यांचे आभार व्यक्त करीत आज नागपूर बस फेरीचे चालक लक्ष्मन श्रीराव व वाहक रहाटे यांचा सत्कार केला.याप्रसंगी कुरखेडा शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी,कुरखेडा काँग्रेस तालुकाध्यक्ष जिवन नाट,माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे,राष्ट्रवादी कांग्रेस तालुकाध्यक्ष राम लांजेवार, नगरसेवक ॲड.उमेश वालदे,डॉ.सतिश गोगुलवार, प्रा.कीशोर खोपे,प्रा.डॉ.दशरथ आदे,डॉ.जगदीश बोरकर,केशव गूरनूले,राजेश उईके,सी.एल.डोंगरवार, पूंडलिक देशमुख,पूष्पराज रहांगडाले,ममता गिरडकर,योगीता मडावी,राजेश जेठानी,जावेद शेख,राकेश चव्हाण,पत्रकार सिराज पठान,चेतन गहाने,नायब तहसीलदार रेखा बोके,श्यामराव सोनुले यांचेसह शहरातील नागरीक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!