- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील
अड्याळ परिसरात काल शनिवारी एका अस्वलाने नागरी वस्तीत शिरकाव केल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आणि धावपळ सुटली.प्रशांत करंजेकर यांच्या घरामागे शेतात असलेल्या झाडावर अस्वलाने ठाण मांडले होते.प्रसंगी तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अस्वलाला जेरबंद करण्यात वनविभागाच्या चमूला यश आल्याने मोठा अनर्थ टळला.सकाळच्या सुमारास प्रशांत करंजेकर यांच्या घरामागील शेतातील झाडावर एक अस्वल चढल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच बघ्यांची मोठी गर्दी जमली.लोक वस्तीच्या इतक्या जवळ हिंस्त्र श्वापद असल्याने परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते.घटनेची माहिती मिळताच अड्याळ ग्रामपंचायतीचे सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि उपसरपंच शंकर मानापुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वनविभागाला पाचारण केले.भंडारा उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह,सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलक यांच्या मार्गदर्शनाखाली अड्याळ वनविभागाचे कर्मचारी व भंडारा येथील जलद बचाव दल घटनास्थळी दाखल झाले.झाडावर चढलेल्या अस्वलाला खाली उतरवण्यासाठी वनविभागाच्या पथकाने अत्यंत सावधगिरीने अस्वलाला ‘डॉट शॉट’ मारून बेशुद्ध केले.अस्वल बेशुद्ध झाल्यानंतर झाडाच्या फांद्या कापून त्याला सुरक्षितरित्या खाली उतरवून पिंजऱ्यात हलवण्यात आले.जेरबंद करण्यात आलेल्या अस्वलावर प्राथमिक उपचार करू त्याला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यात येईल,असे वनविभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
व्हायरल व्हिडिओ👇
- Advertisement -

