Tuesday, July 21, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा-न्हानी फाट्याजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी..

कुरखेडा-न्हानी फाट्याजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरापासून देसाईगंज मार्गे अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या न्हानी फाट्याजवळ काल,गुरुवार १७ एप्रिलच्या रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान झालेल्या पिकप वाहन व दुचाकी अपघातात एकाचा उपचारादरम्यान कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला तर अपघातातील गंभीर जखमी तरुणास गडचिरोली रुग्णालयातून नागपूरला हलविण्यात आले आहे.गुड्डू बेनिराम सहारे असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे तर राजेंद्र बोरकर असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार,कुरखेडा-न्हानी फाट्याजवळ काल गुरुवारच्या रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान पिकप वाहन व दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली.अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते.यात गुड्डू बेनिराम सहारे व राजेंद्र बोरकर यांना जबर मार लागल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत लगेच अपघाताची माहिती १०८ वर कळवून जखमींना प्राथमिक उपचाराकरिता सर्वप्रथम कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.अशातच गुड्डू बेनिराम सहारे यांचेवर कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार होते.तर राजेंद्र बोरकर यांना रात्रीच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.अशातच गुड्डू सहारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर राजेंद्र बोरकर यांना गडचिरोली रुग्णालयातून नागपूरला हलविण्यात आले आहे.
अपघाताची घटना घडताच पिकप वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला होता.अशातच काहींनी पिकप वाहनाची मोबाईलमध्ये फोटो काढून घेतली,वाहन क्रमांक-एम एच ३० बीडी २८६० असे घटना स्थळावरून पसार झालेला पिकप वाहन आहे.घटनेची माहिती कळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत घटनास्थळावरून पसार वाहनाच्या शोधात आहेत.घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!