Tuesday, July 21, 2026
Homeदेसाईगंजआज देसाईगंज येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवणपटलावर...

आज देसाईगंज येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवणपटलावर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन.. – महात्म्यांना केवळ वर्ग-जाती पुरतेच मर्यादीत ठेवू नका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नुकतीच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अशातच ज्या लोकांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या वर्गसमूहाशी जोडले,अश्यांनी त्यांना फक्त त्यांच्या वर्गापुरतेच मर्यादीत ठेवले आहे.म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ माळी समाजाचेच तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बौद्ध समाजाचेच असल्याची भावना अनेकांच्या मनात रुजलेली दिसून येत आहे.इतर वर्ग आणी धर्माचे लोकही त्यांना फक्त शोषितांचे नायक म्हणून पाहू लागलेत.परंतू समतेच्या क्रांतीचे जनक व भारतीय संवीधानाच्या शिल्पकाराचा आदर केवळ त्यांना एखाद्या विशिष्ट समुदायाचा नायक म्हणून न दाखवता राष्ट्रीय नायक म्हणून चित्रीत करुनच करता येईल.जात-वर्ग-द्वेष या मानसिकतेतून बाहेर पडल्याशिवाय हे शक्य नाही.म्हणून राष्ट्रीय नायक महात्मा ज्योतीबा फुले व समता,स्वातंत्र्यता, बंधूता आणि सामाजिक न्याय यांचे प्रखर प्रणेता राष्ट्रीय नायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्य फक्त राष्ट्रीय संस्कृती प्रदर्शित करावी व या थोर राष्ट्रनिर्मात्यांच्या विचारांचा वारसा भावी पिढींना प्रेरणादायी ठरावा आणी त्यांनी सांगीतलेल्या क्रांतीकारी विचारांची ज्योत मनामनात सदोदीत तेवत रहावी,या मंगलमय कामनेतून आज,शुक्रवार १८ एप्रिलला  राष्ट्रनिर्माते विचारमंच,देसाईगंज (वडसा) यांच्या वतीने शहराच्या फव्वारा चौक या ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात आज सायंकाळी ५ वाजे आकाश अंबादे व संच यांचे सांस्कृतीक प्रबोधन व सायंकाळी ६ वाजता वैचारीक प्रबोधन होणार आहे.वैचारीक प्रबोधनामध्ये डॉ.प्रकाश राठोड साहीत्यीक नागपूर, सर्जनादित्य मनोहर साहीत्यीक नागपूर,छायाताई खोब्रागडे सामाजीक कार्यकर्त्या नागपूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी सदर कार्यक्रमाचा जास्तीत-जास्त जनतेनी लाभ घ्यावा,असे आवाहन राष्ट्रनिर्माते विचारमंच,देसाईगंज(वडसा)च्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!