उद्रेक न्युज वृत्त
कूरखेडा(गडचिरोली) :- ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने युवक जागीच ठार झाल्याची घटना काल,गुरूवारी सकाळच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाकडी येथे घडली.मनीष यादव लोहंबरे वय २४ वर्षे रा.वाकडी असे मृतक युवकाचे नाव आहे.
मृतक मनीषचे कुरखेडा येथे किराना दूकान आहे.तो गावावरून कुरखेडा येथे दुकानामधे जात असताना दरम्यान वाकडी येथीलच ट्रक्टर विरूद्ध दिशेने जात होते.ट्रॅक्टरला केजव्हील लावण्यात आले होते. त्यामुळे ट्रक्टच्या टायरांनी बराच रस्ता व्यापला होता. अशातच ट्रॅक्टर व दुचाकी यांची धडक बसली. दुचाकीस्वार ट्रॅक्टरमध्ये सापडून ठार झाला.कुरखेडा पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त करून मर्ग दाखल केला आहे.पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.

