Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरकिरकोळ वाद ठरला तरुणाच्या खुनाचे कारण; सहा आरोपी अटकेत..!

किरकोळ वाद ठरला तरुणाच्या खुनाचे कारण; सहा आरोपी अटकेत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-किरकोळ वादाच्या कारणावरून तब्बल सहा युवकांनी मिळून एका २७ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना आज,गुरुवार २३ ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर शहराच्या विधी महाविद्यालय समोरील परिसरात घडली असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.नितेश वासुदेव ठाकरे वय २७ वर्षे रा.बेताल चौक,वॉर्ड क्रमांक-१ दुर्गापूर चंद्रपूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो शहराच्या विधी महाविद्यालय समोरिल परिसरात मृतावस्थेत पडून होता.घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला तसेच रामनगर पोलिसांना मिळताच पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.लागलीच एका तासाच्या आत आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.त्यानुसार सहाही आरोपींना ताब्यात घेत सदरचा खून हा किरकोळ वादाच्या कारणावरून केल्याचे आरोपींनी मान्य केले असून खून प्रकरणी २२ वर्षीय प्रतिक माणिक मेश्राम रा. , दुर्गापूर वार्ड क्रमांक-४,तौसिक अजीज शेख वय २३ वर्षे,रा.फातेमा मस्जिद जवळ,वार्ड क्र.३,दुर्गापूर,करण गोपाल मेश्राम वय २२ वर्षे,रा.भिमनगर,वार्ड क्र.४, दुर्गापूर,सुजीत जयकुमार गणविर वय २५ वर्षे, रा. भिमनगर, वार्ड क्र.४,दुर्गापूर,अनिल रामेश्वर बोंडे वय २२ वर्षे,रा.समता नगर,दुर्गापूर,यश छोटेलाल राऊत वय १९ वर्षे,रा.भिमनगर,वार्ड क्र.४,दुर्गापूर अशी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत.
प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस प्रशासन करीत आहे.सदरची कारवाई एसपी मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांचे नेतृत्वात एपीआय देवराव नरोटे,एपीआय दीपक कांक्रेडवार, एपीआय बलराम झाडोकार,पीएसआय विनोद भुरले, पीएसआय संतोष निंभोरकर,पीएसआय सर्वेश बेलसरे,पीएसआय सुनिल गौरकार,सहाय्यक फौजदार स्वामीदास चालेकर,पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, इम्रान खान,नितीन साळवे,रजनीकांत पुठठावार,दीपक डोंगरे,अजय बागेसर यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!