Thursday, September 3, 2026
Homeनागपूरदररोज बदलतो सोने-चांदीचा भाव; लाख मोलाचे मौल्यवान धातू..

दररोज बदलतो सोने-चांदीचा भाव; लाख मोलाचे मौल्यवान धातू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्याच्या घडीलाच नाही तर अनादिकाळापासून दोनच असे मौल्यवान धातू आहेत की,ते ताजे,नगदी आणि तात्काळ पैसे देणारे धातू आहेत. ते म्हणजे सोने आणि चांदी.त्यामुळेच त्यांच्या किंमती कितीही वाढल्या तरीही अनेकजण त्यात गुंतवणूक करतांना दिसून येतात.सोने-चांदीचा भाव दररोज कमी जास्त होत असतो.याचे मुख्य कारण म्हणजे,आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिरता आणि अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ वा कमजोरी,सोने-चांदीच्या जागतिक मागणीत वाढ किंवा घट तसेच गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे कमी-अधिक कल यामुळे दररोज सोने-चांदीचे दर कधी कमी होतात तर कधी जास्त होतांना दिसून येतात.२१ ऑक्टोंबरच्या तुलनेत,२२ ऑक्टोंबर रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती.२४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३२ हजार ३५५ प्रति १० ग्रॅमवरून(३ टक्के जीएसटीसह)थेट १ लाख २५ हजार ७६३ रुपयांपर्यंत खाली आला होता.केवळ २४ तासांतच ६ हजार ५२२ रुपयांची घसरण नोंदवली गेली होती.तर काल गुरुवारी मोठी उलथापालथ होऊन नागपुरात सोन्याने तेजीचा सूर लावत १ हजार २३६ रुपयांची वाढ नोंदवली गेली.त्यानुसार काल गुरुवारी ३ टक्के जीएसटीसह २४ कॅरेट सोने १ लाख २७ हजार ७२० रुपयांवर पोहोचले.त्यातच चांदीचे दर २० ऑक्टोंबरला १ लाख ७३ हजार ०४० रुपये.
२१ ऑक्टोंबरला १ लाख ७३ हजार ७६१ रुपये तर
२२ ऑक्टोंबर रोजी १ लाख ६२ हजार ७६४ रुपयांवर पोहचली.त्यातच काल गुरुवारी एक किलो चांदीचे भाव १ लाख ५८ हजार ६२० रुपयांपर्यंत खाली आले.
सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून वाढलेली मागणी आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली.तर औद्योगिक मागणीत घट आणि जागतिक बाजारातील मंदीच्या प्रभावामुळे चांदीचे दर कोसळले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!