- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अनेक राजकीय पक्ष,संघटना व नागरिकांद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे,मोर्चे, आंदोलन,सभा,मिरवणूक किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जाण्याची शक्यता लक्षात घेता गुरुवार,२३ ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपासून ते येत्या ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे.जमावबंदी आदेशाच्याकालावधीत शस्त्र,सोटे,तलवारी,भाले,लाठ्या, बंदुका किंवा शरीरावर इजा करण्यासाठी वापरता येतील, असे इतर कोणतेही उपकरण आणि दाहक व स्फोटक पदार्थ सोबत ठेवण्यास पूर्ण मनाई राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती,त्यांच्या प्रतिमा किंवा त्यांच्या दर्शविण्याने समाजात असंतुलन निर्माण करणारे प्रदर्शन, अशोभनीय घोषणाबाजीस मनाई राहणार आहे.जमाव, मिरवणुका,मोर्चे किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस ठाणे अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- Advertisement -

