Tuesday, April 28, 2026
Homeभंडाराकमकुवत समजणाऱ्या उमेदवाराने नाना पटोलेंना फोडला घाम... - पटोलेंचा २०८ मतांनी निसटता...

कमकुवत समजणाऱ्या उमेदवाराने नाना पटोलेंना फोडला घाम… – पटोलेंचा २०८ मतांनी निसटता विजय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या साकोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी राहिली. हाय व्होल्टेज असलेल्या या निवडणुकीत सुरुवातीपासूनच आघाडी पिछाडीचा खेळ रंगत गेला.पहिल्या फेरीत आघाडीवर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काही फेऱ्यानंतर
 पिछाडीवर गेले.भाजपचे अविनाश ब्राम्हणकर हे कधी आघाडी तर कधी पिछाडीवर होते.२८ फेऱ्यांपैकी १४ व्या फेरीअखेर काँग्रेसचे नाना पटोले हे अवघ्या ४६९ मतांनी आघाडीवर होते.तर १६ व्या फेरीअखेर भाजपचे अविनाश ब्राम्हणकर ११३ मतांनी आघाडीवर होते.१६ व्या फेरीनंतर मात्र ब्राम्हणकर यांनी आघाडी घेतली.१६ व्या फेरीनंतर ब्राम्हणकर १२३ मतांच्या आघाडीवर होते. २२ व्या फेरीनंतर ब्राम्हणकर २९५५ मतांनी आघाडीवर होते.२४ व्या फेरीत ब्राम्हणकर २२०० मतांनी आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा कायम होती.अखेरीस २८ व्या शेवटच्या फेरीत नाना पटोले अवघ्या २०८ मतांनी विजयी झाले.भाजपचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांना कमकुवत उमेदवार म्हणून संबोधले जात होते. परंतु,याच कमकुवत उमेदवाराने नाना पटोलेंना तगडी लढत देत घाम फोडला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोरचीतून निघाले अन् चंद्रपुरात सापडले; तब्बल २४ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-तब्बल २१ गोवंशांची अवैधरीत्या तस्करी करणाऱ्या तिघांपैकी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मोठे यश आले आहे.या कारवाईत...

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लवकरच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती.त्यात ३७ हजार...

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!