Wednesday, August 26, 2026
Homeभंडाराउरलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवली; दुसऱ्या दिवशी खाताच एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा..

उरलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवली; दुसऱ्या दिवशी खाताच एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-घरी आयोजित एका कार्यक्रमानिमित्त भाजी बनवली होती.उरलेली भाजी घरातील फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्यावर एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची  घटना शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्याच्या सरांडी येथे उघडकीस आली.
ताराबाई मुखरू कुंभरे वय ६५ वर्षे,शालिनी रमेश कुंभरे वय ४० वर्षे,गोवर्धन मुखरू कुंभरे वय ५२ वर्षे, सुजिता रमेश कुंभरे वय १४ वर्षे,दुर्गा रमेश कुंभरे वय ११ अशी विषबाधा झालेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.ताराबाई कुंभरे यांच्या घरी गुरुवारी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांतर्गत त्यांनी उडदाच्या डाळीच्या पानवड्याची भाजी बनविली होती.कार्यक्रमानंतर घरातील सर्वांनी जेवण करून उरलेली भाजी घरातील फ्रीजमध्ये ठेवली होती.
सकाळच्या सुमारास फ्रीजमध्ये ठेवलेली भाजी गरम करून कुटुंबीयांनी खाल्ली.मात्र,सायंकाळच्या सुमारास पाचही जणांची प्रकृती खालावली.यामुळे त्यांना सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.मात्र,रात्रभरात कुणालाही आराम न झाल्याने या सर्वांना काल, शनिवारी २६ ऑक्टोंबरला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती होताच सहायक पोलिस निरीक्षक आशिष गंद्रे, हवालदार गोपाल कोसरे आदी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सध्या पाचही जणांवर लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कुटुंबप्रमुख ताराबाई यांची प्रकृती वयोमानानुसार गंभीर असून उर्वरित ४ जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!