Sunday, June 21, 2026
Homeदेसाईगंजउद्याला देसाईगंज दीक्षाभूमी येथे रमाई उत्सवानिमित्त समाज प्रबोधन तथा नाट्य प्रयोगाचे आयोजन..

उद्याला देसाईगंज दीक्षाभूमी येथे रमाई उत्सवानिमित्त समाज प्रबोधन तथा नाट्य प्रयोगाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहर बौद्ध समाज कोअर कमीटीच्या वतीने उद्या रविवार दिनांक-९ फेब्रुवारीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्श देसाईगंज दीक्षाभूमीवर रमाई उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.रमाई उत्सवाचे औचित्य साधून कमिटीच्या वतीने दुपारी १ वाजे समाज प्रबोधन तर रात्रो ७ वाजेच्या सुमारास ‘रमाई झाली महान’ नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर होऊ घातलेल्या समाज प्रबोधन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम तर उदघाटक आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले असणार आहेत.तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अभिलाषा गावतुरे व पत्रकार,कवी तथा लेखक अविनाश टिपले हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत.रात्री ७ वाजताच्या सुमारास कवीवर्य भिमानंद मेश्राम लिखित व दिग्दर्शित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सहचरिणी त्यागमुर्ती रमाई यांच्या जिवनावर आधारित ‘रमाई झाली महान’ या नाटकाचे प्रयोग मोफत दाखविण्यात येणार आहे.त्यामुळे
समाज प्रबोधन तथा नाट्य प्रयोगाचा लाभ समस्त जनतेंनी घ्यावा; असे आवाहन देसाईगंज शहर बौद्ध समाज कोअर कमेटीचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे,प्रवक्ते विजय बन्सोड,सचिव हंसराज लांडगे,कार्याध्यक्ष भिमराव नगराळे,उपाध्यक्ष साजन मेश्राम,सुरज ठवरे सह सुनील सहारे आदिंनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य...

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!