Monday, August 24, 2026
Homeचंद्रपूरउद्याला चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे रेड अलर्ट; सर्व शाळांना सुट्टी जाहीर..

उद्याला चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे रेड अलर्ट; सर्व शाळांना सुट्टी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या,शुक्रवार २५ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यास “रेड अलर्ट” दिलेला असून काही ठीकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविलेली आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये,याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या,पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा,विद्यालये,महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना उद्या,शुक्रवार २५ जुलै सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.याबाबत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.नितिन व्यवहारे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३० (२) (५) व (१८) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन,चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या,पूर्व प्राथमिक,प्राथमिक व माध्यमिक शाळा,विद्यालये,महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना सुट्टी जाहिर केली असून नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर संपर्क क्र.०७१७२२५००७७(07172 250077)यावर
संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!