- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-उगीचच डोकं खाजवून कश्याला डोक्याला ताण द्यायचं रे बाबा..! म्हणीत बी.ए.प्रशासकीय प्रथम वर्षाचा योग आणि जीवन विज्ञान शिक्षण या विषयाचा शेवटचा पेपर सुरू असतांना चक्क प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मोबाइलद्वारे सर्च करून उत्तरे लिहीत असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यापासून २० किलोमिटर अंतरावर असलेल्या कांद्री येथील श्री संत गजानन महाराज प्रशासकीय महाविद्यालयात उघडकीस आला.प्रकरणी तब्बल २२ विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने सर्वजण अवाक् होऊन एकमेकांकडे टकमक बघू लागलेत.
अधिक माहिती अशी की,मोहाडी तालुक्या पासून २० किलोमिटर अंतरावर असलेल्या कांद्री येथील श्री संत गजानन महाराज प्रशासकीय महाविद्यालयात शुक्रवारी २७ डिसेंबरला बी.ए.प्रशासकीय प्रथम वर्षाचा योग आणि जीवन विज्ञान शिक्षण या विषयाचा शेवटचा पेपर सुरू होता.अशातच विद्यापीठाच्या नागपूर येथील भरारी पथकाने विद्यालयात धाड टाकली.धाड टाकताच ‘अपनेही रंग मे रंगणे वाले’ असे दृश्य भरारी पथकास दिसून आले.चक्क परीक्षा खोली क्रमांक-१ मध्ये दोन विद्यार्थी तर खोली क्रमांक-२ मध्ये २० विद्यार्थी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मोबाइलद्वारे सर्च करून उत्तरे लिहीत होते.त्यामुळे एकूण २२ विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या पथकाने निलंबनाची कारवाई केली आहे.कारवाईदरम्यान सर्व विद्यार्थ्यांजवळ मोबाइल असल्याचे आढळून आल्याने भरारी पथकही आश्चर्यचकित झाले.महत्वाचे म्हणजे,सर्वच्या-सर्वच विद्यार्थ्यांकडे परीक्षे दरम्यान मोबाईल कसे? तेही उत्तरे शोधण्यासाठी..! असा मोठा गहण प्रश्न निर्माण झाला आहे.
- Advertisement -

