Tuesday, July 28, 2026
Homeगोंदिया११ व्या वर्गातील विद्यार्थिनी जळाली; उपचारादरम्यान मृत्यू... - चुली जवळ बसून करीत...

११ व्या वर्गातील विद्यार्थिनी जळाली; उपचारादरम्यान मृत्यू… – चुली जवळ बसून करीत होती अभ्यास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-गेली तीन ते चार दिवसांपासून थंडीचा कहर कमी झाला असला तरीही रात्रीच्या सुमारास तसेच पहाटे अजूनही थंडीचा जोर कायम आहे.हल्ली चुली ऐवजी गॅसवर स्वयंपाक वा इतर कार्ये केली जात असली तरीही ग्रामीण भागात आजही चुलीवर पाणी गरम करणे व इतर बाबी केल्या जातात.अशातच गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात एक अनुचित तथा दुर्दैवी घटना उघडकीस आल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.११ व्या वर्गात शिक्षण घेणारी चांदणी किशोर शहारे वय १७ वर्षे,रा.मरामजोब,ता. देवरी,जि.गोंदिया ही शुक्रवारी २७ डिसेंबरला  पहाटे ५ च्या सुमारास अभ्यास करण्यासाठी उठली.पहाटे थंडी वाटत असल्याने घरी पेटविलेल्या चुलीजवळ अभ्यास करीत होती.अशातच अभ्यास करीत असतांना अचानक चुलितील विस्तव चांदणीच्या कपड्यांना लागला.त्यामुळे अचानक लागलेल्या आगीत ती पूर्णतः जळाली.कुटुंबीयांना लक्षात येताच धाव घेत एकच हंबरडा फोडला.त्यानंतर चांदणीला गंभीर अवस्थेत देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,शरीर जास्त जळाल्याने गोंदियाला हलविले. प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला हलविण्यात आले. नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू असतांना अखेर चांदणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा हादरा बसला असून गावात चांदणीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!