Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरउंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करणाऱ्या वनाधिकाऱ्यांची हकालपट्टी करा..! - गावकऱ्यांची मागणी...

उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करणाऱ्या वनाधिकाऱ्यांची हकालपट्टी करा..! – गावकऱ्यांची मागणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे.याला अनेक कारणे आहेत,परंतु वन विभागाचे अपुरे प्रशिक्षित मनुष्यबळ,अध्यावत संरक्षण साहित्य नाहीत.मिश्र तथा नैसर्गिक वनक्षेत्र वाढण्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे वन्यप्राणी गावाशेजारी येत आहेत.त्यामूळे शेतकरी,गरीब मजुरांचा नाहक बळी जात आहे.धाबा आणि विरुर वनपरिक्षेत्रात तेलंगनातून आलेल्या तिबेट नामक वाघाने धुमाकूळ घातला आहे.अनेक जनावरे, माणसांवर हल्ले करणे सुरू केले आहे.धाबा क्षेत्रात ग्रामस्थ आणि वनकर्मचारी संयुक्तपणे गस्त करीत आहेत; परंतु विरुर वनक्षेत्रात मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान,कोष्टयाला येथील एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्याची घटना ताजी असतांनाच,परत कवितपेट क्षेत्रात एका महिलेचा वाघाने बळी घेतला. यामुळे या क्षेत्रातील जनता,शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.अशा घटना होत असतांना उपविभागीय वन अधिकारी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी स्वतः हजर राहून ही कारवाई पूर्ण करायला पाहीजे.मृतकाच्या नातेवाईकास तात्काळ मदत देतांना सुद्धा एकही सक्षम अधिकारी उपस्थित नव्हता.जनतेच्या रोषाला केवळ वनपाल कसेबसे उत्तर देऊन प्रकरण हाताळीत होते.केवळ स्थानिक वन कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देऊन केवळ उंटावरून शेळ्या हाकलण्याचा प्रकार येथे सुरू आहे.येथील वनपरिक्षेत्र अधिकारी परिविक्षाधीन असल्याने नियमानुसार त्यांना नियमित वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून ठेवता येत नाही; असे सांगण्यात येते.त्यांचा अनुभव सुद्धा कमी असल्याने जनतेशी योग्य समन्वय ठेवण्यात अपयशी ठरले आहे.यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून,या वन अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी; प्रशिक्षित वन कर्मचारी तैनात करावे,ड्रोन कॅमेराने निगराणी ठेवावे; अशी मागणी केली जात आहे.
राजुरा उपविभागीय वनक्षेत्र अंतर्गत विरुर वनपरिक्षेत्रात दोन दिवसात वाघाने दोघांचा बळी घेतला.लोक दहशतीच्या छायेत आहेत परंतु उपविभागीय वनाधिकारी आणि विरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मात्र स्थानिक वन कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देऊन स्वतः उंटावरून शेळ्या हाकलण्याचे काम करीत असल्याने,असा तोरा मिळविणाऱ्या या वनाधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!