Sunday, April 19, 2026
Homeआरमोरीआरमोरी शहरवासी तीन दिवसांपासून तहानलेलेच…-शहरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती…

आरमोरी शहरवासी तीन दिवसांपासून तहानलेलेच…-शहरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :- आरमोरी येथील वैनगंगा नदीवरून आरमोरी शहराला पाणीपुरवठा केला जातो.मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या मशीन जळाल्याने आरमोरी शहराचा पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून ठप्प पडला आहे.त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

आरमोरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सयंत्रणेत दर महिन्याला बिघाड येत असतो.कमी जास्त विजेच्या दाबामुळे पाणीपुरवठा करणा-या सयंत्रणेत बिघाड ही नित्याचीच बाब बनली आहे.सध्या आरमोरी शहराला नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी शहराचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. एका भागामध्ये सकाळी तर दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी अशाप्रकारे एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.यामुळे दररोज शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

अशात पाणीपुरवठा करणाऱ्या मशीन जळाल्याने तीन दिवसांपासून शहरवासीयांना पाण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहे.वैनगंगा नदीवरील वीज ही मागील अनेक वर्षांपासून सिंगल फेजद्वारा चालत आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण कार्यालयातून वारंवार विजेचा लपंडाव होत असल्याने जलकुंभात पूर्णपणे पाण्याचा साठा होत नाही.वैनगंगा नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या सयंत्रात दर महिन्याला बिघाड येत असल्याने आरमोरीकरांना महिन्यातून दहाच दिवस पाणी मिळते.परंतु नगर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!