Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी तालुक्यातील रानटी हत्तींनी केलेल्या नुकसानीची शेतकऱ्यास भरपाई मंजूर..

आरमोरी तालुक्यातील रानटी हत्तींनी केलेल्या नुकसानीची शेतकऱ्यास भरपाई मंजूर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज-वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या आरमोरी तालुक्यातील सूर्यडोंगरी शिवारात रानटी हत्तींनी केलेल्या मका पिकाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यास मंजूर करण्यात आली असल्याची माहिती देसाईगंज-वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक वरुण बी.आर.यांनी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील सुर्यडोंगरी शिवारात १८ मार्च २०२५ रोजी हत्तींनी देविदास बालाजी मेश्राम यांच्या शेतात मका पिकाचे नुकसान केले होते.त्यानुसार पोर्ला वनपरिक्षेत्रातील कर्मचारी,कृषी सहाय्यक तसेच तलाठी यांनी तात्काळ पंचनामा करून देसाईगंज-वडसा वन विभागास प्रकरण सादर केले.वन विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयने शेतकरी मेश्राम यांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून देसाईगंज-वडसा वनविभागाकडून शेतपिक नुकसानभरपाई प्रकरणे योग्य त्या शासन निर्णयांना अनुसरुन लवकरात-लवकर अदा करण्यात येणार असल्याचेही उपवनसंरक्षक वरूण बी.आर.यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!