- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतजमिनी संबंधित कागदपत्रांसाठी ऑनलाईन सेतू केंद्रांत होणारी गर्दी व शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी व्हावा; यासाठी शासनाच्या महाभूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.आता आता सातबाऱ्यासह इतर दस्तऐवज थेट व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत.त्यानुसार येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून सातबारा उतारा,८अ उतारा, फेरफाराची नोंद आणि ई-रेकॉर्ड्स हे महत्त्वाचे दस्तऐवज नागरिकांना केवळ १५ रुपयांत थेट व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.सदरची योजना ही येत्या १५ जुलैपासून सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे.त्यानंतर संपूर्ण राज्यात ही योजना पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करण्यास फायदेशीर ठरणार आहे.या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना आता जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी महा ई-सेवा केंद्रांवर रांगा लावण्याची गरज नाही.यामुळे फसणवूकीचे प्रकार टाळले जाऊ शकणार आहेत.ही सेवा केवळ १५ रुपयांमध्ये आहे.यामुळे कागदपत्रांच्या गैरवापराची भीती कमी होणार आहे.
सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी पोर्टल
पोर्टलवर जाऊन नागरिकांना आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा लागणार आहे.नोंदणीसाठी एकदाच ५० रुपये शुल्क आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा द्यावा लागणार आहे.यावेळी मोबाईल क्रमांक ओटीपी (OTP)द्वारे पडताळला जाणार आहे.नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सातबारा,८ अ,फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड्स सहजपणे व्हॉट्सॲपवर डाउनलोड करता येतील.संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे मध्यस्थांचा अथवा एजंटचा हस्तक्षेप नसणार आहे.
- Advertisement -

