- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर ‘पोलीस’ असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून त्यांचे खासगी वाहन चालवित असतात.अशा प्रकारावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती व एका सुजाण नागरिकाने यावर निर्बंध घालण्याची मागणी केल्याने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना कारवाईबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.अप्पर पोलीस महासंचालक(वाहतूक)कार्यालयाने यासंदर्भातील पत्र राज्यभर पाठविले असून,आता खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी पाटी अथवा लाल अक्षरात ‘पोलीस’ लिहिलेल्या वाहनांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियम,१९८९ मधील नियम १३३ (६) तसेच मोटार वाहन कायदा,१९८८ च्या सहकलम १७७ अंतर्गत कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सखाराम कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती.तक्रारीत,राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी,अंमलदार आपल्या खासगी वाहनांवर “पोलीस” अशी लाल रंगाची पाटी अथवा “पोलीस” लाल अक्षरात लिहून त्यांचे खासगी वाहन चालवित असतात. यावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून याबाबत कारवाईचे निर्देश दिलेले आहेत.”पोलीस “पाटी असल्याने ती गाडी चेक केली जात नाही तसेच “पोलीस” असे लिहलेली गाडी चेक होत नसल्यामुळे भाडे तत्वावर अवैध वस्तुंची ने-आण करण्यासाठी वापरली जाते.त्यामुळे अशा खासगी वाहनांवर लाल अक्षरात “पोलीस “लिहलेल्या व “पोलीस” अशी पाटी लावलेल्या वाहन चालकांवर निर्बंध घालावेत,असे म्हटले होते. त्यानुसार,यापुढे खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी पाटी किंवा मजकूर आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- Advertisement -

