Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता गणित आणि विज्ञान विषयात पास होण्यास ३५ नाही तर २० गुण...

आता गणित आणि विज्ञान विषयात पास होण्यास ३५ नाही तर २० गुण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गणित विषय म्हटले की,दहावीला अनेकांची दांडी उडालेली दिसते.३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले तरी पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे.अभ्यासक्रम आराखड्यातील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना आता कमी गुण मिळाले तरी अवघड गणित सोपे होणार आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील तरतुदींनुसार विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले,तरी असा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकणार आहे.त्याच्यासमोर परीक्षा पुन्हा देणे किंवा एका विशिष्ट शेऱ्यासह दहावीचे प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे,असे दोन पर्याय असणार आहे.ज्यांना विज्ञान किंवा गणितातील अभ्यासक्रम पुढे करायचे नाहीत अशांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
गणित आणि विज्ञान या विषयांच्या भीतीमुळे किंवा हे विषय उत्तीर्ण न झाल्याने काही विद्यार्थी इयत्ता दहावीनंतरचे शिक्षण थांबवतात,यामुळे ही सूट देण्याचा विचार केल्याचे राज्य अभ्यासक्रम आराखड्यात निरीक्षण नोंदवले आहे.आठवीपासून येणाऱ्या बीजगणित,भूमिती या विषयाची काठिण्य पातळी झेपत नाही,अशा विद्यार्थ्यांसाठी सामान्य गणित असा नवा विषय अस्तित्वात आला होता. सामान्य गणित या पर्यायापेक्षा मुख्य विषयाचा विचार करून हे पर्याय आता नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात पर्याय दिले आहेत.ज्या विद्यार्थ्यांना अकरावी,बारावीत किंवा भविष्यात गणित व विज्ञान विषयांमध्ये करिअर करायचे नसेल आणि फक्त या दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षण खोळंबणार असेल,तर त्यांच्यासमोर दोन पर्याय उपलब्ध असतील.या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होता येईल.दुसरा पर्याय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना २० पेक्षा जास्त,पण ३५ पेक्षा कमी गुण असतील,त्यांच्या प्रमाणपत्रावर एक शेरा मारून त्यांना उत्तीर्ण केले जाईल.’सदर विद्यार्थ्याला गणित/विज्ञान किंवा दोन्हींवर आधारित विषय घेता येणार नाहीत, अशा प्रकारचा शेरा असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव👇
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.हा शनिवार पुस्तकाविना असेल.त्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामातून शिक्षण दिले जाईल.तसेच त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यशाळा, प्रशिक्षण शिबीर आदींचे नियोजन केले जाणार आहे. विद्यार्थी हा फक्त परीक्षार्थी न राहता त्याचा सर्वांगीण विकास व्हावा,हा यामागील उद्देश आहे.
शाळेतील शैक्षणिक वर्षातील १० दिवस ‘दप्तराविना शाळा’ असणार आहे.विविध कला,प्रश्नमंजुषा,खेळ या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासाला प्रोत्साहन दिले जाईल.ऐतिहासिक,सांस्कृतिक आणि पर्यटन या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे,स्मारके यांना भेट देणे,स्थानिक कलाकार व कारागीर यांना भेटणे,आदींचा समावेश या उपक्रमात असेल.तसेच शाळेबाहेर भेटीही दिल्या जाणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!