Saturday, May 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता अपूर्णावस्थेतील राष्ट्रीय महामार्गावर टोल लागणार कमी..

आता अपूर्णावस्थेतील राष्ट्रीय महामार्गावर टोल लागणार कमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखाद्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित झाला नसेल,तर त्या पूर्ण भागाचा टोल घेता येणार नाही.फक्त पूर्ण झालेल्या भागासाठीच टोल आकारला जाणार आहे.याबाबत येत्या,रविवार १५ फेब्रुवारीपासून नवा नियम लागू होणार आहे.विशेष म्हणजे,केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्क(दरनिर्धारण व वसुली)नियम-२००८ मध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती जाहीर केली आहे.सध्याच्या नियमांनुसार,मार्ग प्रवेश-नियंत्रित,वेगवान आणि अखंड प्रवासाची सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावर टोल दर हा सामान्य राष्ट्रीय महामार्गाच्या तुलनेत सुमारे २५ टक्के अधिक आकारला जातो.अश्यातच अनेक प्रकल्प टप्प्याटप्याने सुरू असतांनाच व काही द्रुतगती मार्ग पूर्णपणे सुरू नसतांनाही झालेल्या भागावर २५ टक्के जादा शुल्क आकारले जात होते.यावर प्रवाशांसह संबंधित क्षेत्राकडून नाराजी व्यक्त केली जात होती.नव्या दुरुस्तीनुसार द्रुतगती मार्ग पूर्णपणे सुरू नसल्यास,फक्त सुरू असलेल्या भागासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दराप्रमाणेच टोल आकारला जाणार आहे.त्यामुळे अतिरिक्त २५ टक्के आकारणी आता होणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!