- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या घुग्घूस शहरातील एसीसी सिमेंट उद्योगामार्फत चालविली जाणारी माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा आता अदानी समूहामार्फत चालविली जाणार आहे.नुकतेच या शाळेचे हस्तांतर अदानी समूहाला करण्यात आले आहे.


राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे.दरम्यान, वर्षभरापूर्वीच एसीसी सिमेंट उद्योग अदानी समूहाला हस्तांतरित झाला आहे. आता विरोधकांनी या निर्णयावरून सरकारवर टीका सुरू केल्याने अदानी समूह पुन्हा चर्चेत आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहरात अनेक वर्षांपासून एसीसीसी सिमेंट उद्योग कार्यरत आहे.या उद्योगातील कामगारांच्या पाल्यांकरिता माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा चालविली जात होती.या शाळेमध्ये कामगारांची मुले शिक्षण घेत असताना आता ही शाळा अदानी फाऊंडेशनकडे शासनाने हस्तांतरित केली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने २७ सप्टेंबरला हस्तांतरासंदर्भात एक शासन निर्णय जाहीर केला आहे.या निर्णयानुसार आता एसीसीऐवजी अदानी समूह माऊंट कार्मेल शाळा चालविणार आहे.
अदानी समूहाकडून आता महाराष्ट्र बाराखडी लिहिणार- अंबादास दानवे👇
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांनी एक्स पोस्टवर जोरदार टीका केली आहे.प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे की,देशाला शिक्षणाचा मार्ग देणाऱ्या महाराष्ट्र सरकारवर आज अदानी समूहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे.जमीन, उद्योग कमी होते; ते आता शाळा देखील महायुतीचे सरकार अदानीच्या ताब्यात देत आहे.
- Advertisement -

