Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातून तीर्थ दर्शनास अयोध्याला जाणार ८०० भाविक.. - श्रीराम मंदिरात...

गडचिरोली जिल्ह्यातून तीर्थ दर्शनास अयोध्याला जाणार ८०० भाविक.. – श्रीराम मंदिरात घेणार दर्शन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत  गडचिरोली जिल्ह्यातून पहिल्या फेरीत ८०० भाविक येत्या ७ ऑक्टोंबर रोजी अयोध्या करिता रवाना होणार असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देसाईगंज (वडसा)येथे भाविकांच्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे.अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम,खासदार नामदेव कीरसान आमदार कृष्णा गजबे व डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय दैंने,समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख,सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिनांक-७ ऑक्टोंबरला रेल्वे ११ वाजता देसाईगंज (वडसा)स्टेशन वरून निघेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी  सकाळी वाराणसी येथे पोहचेल.तिथे विश्वनाथ मंदिर दर्शन आणि वाराणसी दर्शन आणि मुक्काम असेल.त्यानंतर ९ ऑक्टोंबरला सकाळी अयोध्या येथे पोहचेल आणि तिथे श्रीराम मंदिरात दर्शन घेणार आणि रात्री परतीचा प्रवास करेल.१० ऑक्टोंबरला दुपारी १२ वाजता देसाईगंज(वडसा)स्टेशन येथे भाविक परत येणार आहेत.भाविकांसोबत वैद्यकीय चमू आणि समाज कल्याण विभागाचे कर्मचारी राहणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!