Tuesday, September 22, 2026
Homeनवी दिल्लीआजपासून शरद पवारांना 'झेड प्लस' सुरक्षा.. - 'झेड प्लस' सुरक्षाविषयी 'घ्या' जाणून..

आजपासून शरद पवारांना ‘झेड प्लस’ सुरक्षा.. – ‘झेड प्लस’ सुरक्षाविषयी ‘घ्या’ जाणून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.सीआरपीएफ अंतर्गत केंद्र सरकारची ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे.आजपासूनच सुरक्षेत वाढ करण्यात आली असून १० कमांडो शरद पवारांच्या सोबत असणार आहेत.सीआरपीएफ च्या अधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. बिलार्ड पिअर येथील कार्यालयात ही भेट झाली. आगामी विधानसभा निवडणुका आणि राज्यातील सध्याचे वातावरण पाहता शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती आहे.

झेड प्लस सुरक्षा ही भारतातील सुरक्षिततेची सर्वोच्च श्रेणी मानली जाते.झेड प्लस सुरक्षेत,१० पेक्षा जास्त कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह ५५ प्रशिक्षित कर्मचारी संबंधित व्यक्तीजवळ तैनात असतात.हे सर्व कमांडो २४ तास त्या व्यक्तीभोवती बारीक नजर ठेवतात.सुरक्षेमध्ये गुंतलेला प्रत्येक कमांडो मार्शल आर्टमध्ये तज्ञ असतो.यासोबतच या गटाकडे आधुनिक शस्त्रेही असतात.भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक मोठे नेते आहेत ज्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
गृह मंत्रालया अंतर्गत सुरक्षेचे अनेक प्रकार आहेत. जसे- X, Y, X आणि Z+ यामध्ये झेड प्लस ही सुरक्षा सर्वोच्च सुरक्षा आहे.एखाद्या व्यक्तीला कोणती सुरक्षा मिळेल याचा निर्णय गृह मंत्रालय घेत असते. मंत्रालयाकडून विशेष अधिकार असलेली समिती वेगवेगळ्या स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेते.अनेक वेळा लोक यासाठी अर्ज करतात, परंतु गृह मंत्रालय राज्य सरकारशी सल्लामसलत करून त्यावर निर्णय घेते.त्यानंतर ते आपला अहवाल केंद्र सरकारला पाठवते.केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा होते आणि त्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!