Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज १५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

आज १५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच तीन राज्याचा विशेष क्षेत्रीय समिती म्हणजेच एमएमसी झोनचा नक्षली प्रवक्ता अनंत याने २२ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र,मध्यप्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती पत्र लिहून सामूहिक आत्मसमर्पण आणि शस्त्रे खाली ठेवण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची मुदत मागितली आहे.कारण की,पूर्वी प्रमाणे नक्षली संघटना राहिलेली नसून तिचा नायनाट होऊ लागला आहे.नक्षली संघटनेत काम करणाऱ्या अनेकांना आता कळलेय की आपण काय करतोय आणि कुणासाठी करतोय,त्यामुळे शांतीच्या मार्गाशिवाय आता पर्याय उरलेला नसल्याचे नक्षलवाद्यांच्या लक्षात येऊ लागल्याने अनेकजण शस्त्रे खाली ठेवण्याचा निर्णय घेत आहेत.अश्याच प्रकारे आज,सोमवार २४ नोव्हेंबरला छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात तब्बल १५ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून शस्त्रे खाली ठेवली आहेत. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये ४ जहाल नक्षलवाद्यांचा समावेश असून संपूर्ण १५ नक्षलवाद्यांवर एकूण ४७ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.विशेष म्हणजे,यात पाच महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!