- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या
शिवराजपूर येथे उद्या,बुधवार २६ नोव्हेंबरला संविधान दिनाचे औचित्य साधून रेणुकाबाई उके विद्यालय शिवराजपूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवराजपूर यांचे संयुक्त विद्यमाने संविधान दिनासह माजी विद्यार्थी मेळावा व पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन गट ग्राम पंचायत शिवराजपूरच्या पटांगणात सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे.सदरच्या कार्यक्रमात प्रामुख्याने शालेय विद्यार्थांचे संस्कृतिक कार्यक्रम,संवाद आणि आठवणीचा कार्यक्रम व माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने होऊ घातलेल्या कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थी तथा पालक वर्गांनी उपस्थित राहावे,असे आवाहन शिवराजपूर येथील रेणुकाबाई उके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा वासनिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ताटपलान यांनी केले आहे.
- Advertisement -

