उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक म्हणजेच इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी ची शिष्यवृत्ती परीक्षा ही १५ दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.विशेष म्हणजे,राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,रविवार ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार होती.मात्र, त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डातर्फे ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सीटीईटी)आयोजित करण्यात आली आहे.यामुळे राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक या (सीटीईटी) परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यामुळे शिक्षकांची अडचण होऊ नये आणि त्यांना (सीटीईटी) परीक्षा देता यावी,यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार,इयत्ता ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या ८ फेब्रुवारी ऐवजी येत्या २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असून याची सर्व विद्यार्थी,पालक, शिक्षक आणि शाळांनी नोंद घ्यावी.
शिष्यवृत्ती परीक्षा १५ दिवस पुढे ढकलल्या..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

