Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीसंपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम व येत्या ६ डिसेंबर रोजीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन लक्षात घेता तसेच धरणे,मोर्चे वा आंदोलनांची शक्यता विचारात घेऊन गडचिरोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे.ही जमावबंदी शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या मध्यरात्रीपासून ते ६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३)अंतर्गत जारी झालेल्या या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय शस्त्रास्त्रे,दाहक पदार्थ,स्फोटके,दगड-क्षेपणास्त्रे बाळगणे, घोषणाबाजी,उत्तेजनात्मक भाषणे, हावभाव,मिरवणुका,सभा,पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी गटागटाने जमणे यास मनाई करण्यात आली आहे.उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी शिवाय कोणताही सार्वजनिक कार्यक्रम,मोर्चा अथवा मिरवणूक आयोजित करता येणार नाही.आदेशाच्या उल्लंघनावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!