Monday, July 27, 2026
Homeनागपूरआकाश रामटेके मौज-मजा म्हणून करायचा चोऱ्या; शेवटी अडकला जाळ्यात..!

आकाश रामटेके मौज-मजा म्हणून करायचा चोऱ्या; शेवटी अडकला जाळ्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-विविध चोर चोऱ्या करून ऐशो-आरामाचे  जीवन जगण्याची इच्छा बाळगतात.पण नागपुरात असाही एक चोर पोलिसांच्या हाती लागलाय की,तो मौज-मजा म्हणून नागरिकांच्या घरी तसेच वाहनांची चोरी करायचा.तो इक्यावरच थांबला नाही,तर त्याने आपल्या टोळीत चक्क दोन अल्पवयीन मुलांनाही आमिष दाखवून सामील केले.मात्र,एका चोरीने त्याचा भांडाफोड झाला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.आकाश नरेंद्र रामटेके वय २३ वर्षे रा. चंद्रमणीनगर,नागपूर असे बहुचर्चित अटकेतील आरोपी चोराचे नाव आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून कार व दुचाकीसह एकूण सात वाहने जप्त करून अटक केली आहे.

  • असे अडकले जाळ्यात👇
आकाश रामटेके हा नागपुरातील बहुचर्चित चोर आहे.छोट्या चोऱ्या करता-करता मोठ्या चोऱ्या करू लागला.अश्याच प्रकारे त्याने मोठा डल्ला मारला.
नागपुरातील अजनीच्या विश्वकर्मानगरात राहणारे फिर्यादी मोहन वासुदेव अंबुलकर यांची बहीण अरुणा सुरेश आस्करकर वय ६० वर्षे ह्या रामेश्वरी परिसरात वास्तव्यास आहेत.१६ जुलैच्या सायंकाळी अरुणा या घराला कुलूप लावून कुटुंबासह मुंबईला गेल्या होत्या. या दरम्यान चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. कपाटातील चांदीचे दागिने आणि अंगणात उभी त्यांची एमएच-३१/ईके-६८१० क्रमांकाची कार चोरी करून पसार झाले.मोहनच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून खबऱ्यांना कामावर लावले.खबऱ्यांना गुप्त माहितीच्या आधारे चोरीत बहुचर्चित चोर आकाश रामटेके याचा हात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार अजनी पोलिसांनी आकाशला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला.त्याने इतरही चोऱ्या केल्याची कबुली दिली.यात दोन अल्पवयीन मुलांचा वापर केला.
त्यानुसार त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!