Monday, July 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरस्त्यात गाठून प्रेमाची कबुली दिल्याने लैंगिक छळ केला,असे सिद्ध होत नाही- उच्च...

रस्त्यात गाठून प्रेमाची कबुली दिल्याने लैंगिक छळ केला,असे सिद्ध होत नाही- उच्च न्यायालय -अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणणाऱ्या तरुणाची निर्दोष सुटका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-एका तरुणाने १४ ऑक्टोंबर २०१९ रोजी नवव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीला शाळेची सुट्टी झाल्यानंतर घरी जात असतांना रस्त्यात गाठले व ‘आय लव्ह यू’ म्हणत आपले प्रेम प्रकट केले.तत्पूर्वी सदरच्या तरुणाने असेच कृत्य केल्याने विद्यार्थिनीने याबाबत शाळेतील शिक्षकांकडे तक्रार केली होती.प्रकरणी शिक्षकांनी तरुणास समज दिली.तरुण ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने परिणामी पोलिसांत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला व प्रकरण न्यायालयात पोहचले. त्यानुसार छत्तीसगडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देत तरुणाची निर्दोष मुक्तता केली होती.नंतर प्रकरण छत्तीसगडच्या उच्च न्यायालयात गेले. छत्तीसगड उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत रस्त्यात गाठून प्रेमाची कबुली दिल्याने लैंगिक छळ केला,असे सिद्ध होत नाही. आरोपीने लैंगिक हेतूने काही गैरकृत्य केले असेल तर त्याच्यावर पोक्सो कायद्यातील लैंगिक छळविषयक कलम लागू होईल. ‘आय लव्ह यू’ हे वाक्य लैंगिक कारण ठरत नाही.आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील भाषेत संवाद साधला नाही,अश्लील चाळे, हातवारे केले नाहीत.हे या प्रकरणातील साक्षींवरूनही सिद्ध झाले आहे.त्यामुळे आरोपीने या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला या आरोपात काहीही तथ्य नाही. विद्यार्थिनीची जात काय आहे,याबद्दल या तरुणाला काहीही माहिती नव्हती.त्यामुळे एससी,एसटी अत्याचार प्रतिबंधक कायदाही या प्रकरणात लागू होत नाही.त्यामुळे त्याला दोषी ठरविता येणार नाही,असे म्हणत छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय अग्रवाल यांनी प्रकरणातील आरोपीची निर्दोष सुटका केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!