- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-विविध चोर चोऱ्या करून ऐशो-आरामाचे जीवन जगण्याची इच्छा बाळगतात.पण नागपुरात असाही एक चोर पोलिसांच्या हाती लागलाय की,तो मौज-मजा म्हणून नागरिकांच्या घरी तसेच वाहनांची चोरी करायचा.तो इक्यावरच थांबला नाही,तर त्याने आपल्या टोळीत चक्क दोन अल्पवयीन मुलांनाही आमिष दाखवून सामील केले.मात्र,एका चोरीने त्याचा भांडाफोड झाला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.आकाश नरेंद्र रामटेके वय २३ वर्षे रा. चंद्रमणीनगर,नागपूर असे बहुचर्चित अटकेतील आरोपी चोराचे नाव आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून कार व दुचाकीसह एकूण सात वाहने जप्त करून अटक केली आहे.
आकाश रामटेके हा नागपुरातील बहुचर्चित चोर आहे.छोट्या चोऱ्या करता-करता मोठ्या चोऱ्या करू लागला.अश्याच प्रकारे त्याने मोठा डल्ला मारला.
नागपुरातील अजनीच्या विश्वकर्मानगरात राहणारे फिर्यादी मोहन वासुदेव अंबुलकर यांची बहीण अरुणा सुरेश आस्करकर वय ६० वर्षे ह्या रामेश्वरी परिसरात वास्तव्यास आहेत.१६ जुलैच्या सायंकाळी अरुणा या घराला कुलूप लावून कुटुंबासह मुंबईला गेल्या होत्या. या दरम्यान चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. कपाटातील चांदीचे दागिने आणि अंगणात उभी त्यांची एमएच-३१/ईके-६८१० क्रमांकाची कार चोरी करून पसार झाले.मोहनच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून खबऱ्यांना कामावर लावले.खबऱ्यांना गुप्त माहितीच्या आधारे चोरीत बहुचर्चित चोर आकाश रामटेके याचा हात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार अजनी पोलिसांनी आकाशला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला.त्याने इतरही चोऱ्या केल्याची कबुली दिली.यात दोन अल्पवयीन मुलांचा वापर केला.
त्यानुसार त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
- Advertisement -