Tuesday, July 14, 2026
Homeकुरखेडाआंधळी-नवरगाव येथे माजी विद्यार्थी सभा उत्साहात संपन्न...

आंधळी-नवरगाव येथे माजी विद्यार्थी सभा उत्साहात संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या आंवान हायस्कूल,आंधळी-नवरगाव येथे माजी विद्यार्थ्यांची सभा मोठ्या उत्साहात पार पडली.या सभेच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंधळीचे उपसरपंच अप्रव भैसारे उपस्थित होते.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांची सभा नियमितपणे आयोजित करण्यात यावी तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत,असे आवाहन केले.सभेचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनवणे  यांनी भूषविले.त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे शाळेच्या प्रगतीतील महत्त्व स्पष्ट करून,माजी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे शाळेला नवी दिशा मिळू शकते,असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमास उपस्थित शिक्षक जनार्धन मस्के,प्रकाश हजारे, लिपिक निखिल डोरलीकर,परिचर लांजेवार,परिचर फुले यांची उपस्थिती लाभली.सभेचे संचालन शिक्षिका चारुलता वालदे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक किशोर मेश्राम यांनी केले.
यावेळी माजी विद्यार्थी प्रभुदास नागोसे,अमरदीप भैसारे, प्रेम भोंडे,रोहित जांभुळकर,प्रीतम भैसारे,अमित बोदेले, पराग विहीरघरे,रुपेश बोदेले,विक्की वलके यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.सदर सभा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडून शाळा व माजी विद्यार्थ्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!