- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील सालाई येथील आदिवासी शेतकऱ्याच्या शेत शिवारातील शेतात असलेली सागवान झाडे अवैधरित्या तोडल्याचा ठपका ठेवत अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे यांनी वन विभागातील दोन अधिकारी आणि दोन कर्मचारी अशा चौघांना निलंबित केले आहे.निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र घाडगे,पारशिवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत,वनरक्षक स्वप्निल आत्माराम डोंगरे,वनक्षेत्र सहाय्यक हिवराज मुकुंदा वाढई या चौघांचा समावेश आहे.कामठी शहरातील नागानी नामक व्यक्तीने वन विभागाकडून त्याच्या सालई शिवारात असलेल्या शेतातील ९,५४७ सागवान झाडे तोडण्याची परवानगी मिळवली होती.वास्तवात,नागानीच्या शेतालगत असलेल्या जंगलातील तसेच शामराव झिबल पुरकाम या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातील सागवान झाडेही परस्पर तोडण्यात आली.त्यानंतर ती झाडे परवानगी असलेल्या झाडांमध्ये मिसळण्यात आली.या प्रकाराची तक्रार प्राप्त होताच वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला.या प्रकरणात वन विभागाचे दोन अधिकार व दोन कर्मचारी सहभागी असल्याचे चौकशीत स्पष्ट होताच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे यांनी चौघांनाही तातडीने निलंबित केले आहे.
वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी नागानीने तोडलेल्या सागवान लाकडांमध्ये २९,८०२ घनमीटर सागवान लाकूड अतिरिक्त आढळले.त्या सागवानाची एकूण किंमत किमान १५ लाख २६ हजार २९३ रुपये आहे.
ते लाकूड शामराव पुरकाम यांच्या शेतातील असल्याचे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अवैध सागवान तोडीचे पुरावे नष्ट केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने सदरची कारवाई करण्यात आली आहे.
- Advertisement -

