Monday, May 4, 2026
Homeदेसाईगंजअवैध वाळू उपसा प्रकरणी देसाईगंज तहसीलदार, मंडळ अधिकारी,तलाठी यांचेवर कारवाईची मागणी... -आंदोलनकर्त्यांनी...

अवैध वाळू उपसा प्रकरणी देसाईगंज तहसीलदार, मंडळ अधिकारी,तलाठी यांचेवर कारवाईची मागणी… -आंदोलनकर्त्यांनी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार.. – देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी शासनाचा महसूल,कर्तव्यात कसूर तथा आर्थिक हितसंबंध जोपासल्या प्रकरणी देसाईगंज तहसीलदार,मंडळ अधिकारी व तत्कालीन तलाठी यांचेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी; अश्या तक्रारीचे पत्र नुकतेच आंदोलनकर्ते नामदेव वसाके यांचे सह सत्यवान रामटेके यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी अवीश्यांत पंडा यांच्याकडे केली आहे. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा वैनगंगा नदी घाटातून मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळूचा उपसा करण्यात आला आहे.अवैध वाळूचा उपसा सुरू असतांना याबाबत गावातील सुजाण नागरिक तथा ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी पत्रव्यवहार करून देसाईगंज महसूल प्रशासनास माहिती देण्यात आली.मात्र,माहिती देऊनही देसाईगंज महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल वा कार्यवाही करण्यात आली नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.कोंढाळा-मेंढा रेतीघाटामध्ये जवळपास २ किलोमिटर वर्तुळाकार अंतर जमिनीपासून ५ फुटाच्यावर हजारो ब्रास वाळूची अवैधरित्या उत्खनन करण्यात आले आहे.देसाईगंज महसूल प्रशासनास वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही तसेच दखल घेत नसल्याप्रकरणी ३० डिसेंबर २०२४ पासून बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे.तत्पूर्वी अवैध वाळूचा उपसा होतांना
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक संबंधात दिनांक-२८/११/२०२४ च्या रात्री ९.०७ वाजेच्या सुमारास कोंढाळा मेंढाघाट रस्त्याच्या दरम्यान देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार विलास तुपट यांनी टीप्पर क्रमांक -MH ४० CT ९८९१,यावर वाहतूक पास नसल्याने ८ ब्रास वाळू भरलेल्या टीप्परवर जप्तीची कारवाई करण्यात आली व त्यानुसार पंचनामा करून देसाईगंज तहसील कार्यालयात सदर टीप्पर जमा करण्यात आला.त्यातच जमा करण्यात आलेला टीप्पर हा देसाईगंज तहसील कार्यालयातून शास्तीची कारवाई होण्यापूर्वीच अज्ञातांनी पळवून नेला.त्यामुळे स्थानिक पत्रकारांनी दखल घेत याबाबत बातम्या प्रसारित केल्या.त्यानुसार  पळविण्यात आलेला टीप्पर परत पुन्हा १० दिवसांनी तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.त्याही वेळेस जप्ती करण्यात आलेल्या टीप्परवर शास्तीची कारवाई करण्यात आली नाही व पळविण्यात आलेल्या टीप्परवर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला नाही.परत पुन्हा शास्तीची कारवाई होण्यापूर्वीच सदरचा टीप्पर आजतागायत पळविण्यात आलेला आहे.अशातच आता बेमुदत ठिय्या आंदोलनावार ठाम असल्याने काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयातून देसाईगंज उपविभागीय कार्यालयात शास्तीची रक्कम भरणा करण्यास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.महत्वाचे म्हणजे पळविण्यात आलेला टीप्पर अजूनही तहसील कार्यालयात जमा करण्यात आला नसल्याने ही नवलाची बाब आहे. त्यामुळे तहसीलदार यांना शासनाच्या महसूला बाबत गांभीर्यता नसून,कर्तव्यात कसूर करून आर्थिक हितसंबंध असल्याचे सदर प्रकारावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.तसेच शासन निर्णय क्रमांक गौखनि-१०/०२०१९/प्र.क्र.९/ख-१ दिनांक-०३/०९/२०१९ चे शासन निर्णय असतांनाही त्यावर तहसील कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.उलट गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी दिनांक-३१/१२/२०२४ रोजी केलेल्या दूरध्वनी संदेशावरून देसाईगंज तहसील कार्यालयाकडून दखल घेऊन दिनांक -०१/०१/२०२५ रोजी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले.तत्पूर्वी कुठल्याही प्रकारचे भरारी पथक वा पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करण्यात आली नाही.तसेच ज्यांच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले आहे,असे मंडळ अधिकारी के.पी.ठाकरे व तत्कालीन तलाठी अर्चना टीचकुले यांना सदर पथकात तपासणी क्षेत्र नेमून दिल्याने शंका उपस्थित केली जात आहे.महत्वाचे म्हणजे,कोंढाळा येथील मेंढा वैनगंगा नदी घाटातून मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळूचा उपसा होतांना जबाबदार मंडळ अधिकारी के.पी.ठाकरे व तत्कालीन तलाठी अर्चना टीचकुले यांनी कुठल्याही प्रकारचा अवैध वाळू उपशावर आळा घातलेला नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.त्यामुळे मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांनाही शासनाच्या महसूला बाबत गांभीर्यता नसून,कर्तव्यात कसूर करून आर्थिक हितसंबंध जोपासल्याचे अवैध वाळू उपशावर वरून स्पष्टपणे दिसून येत आहे.सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शासनाचा महसूल,कर्तव्यात कसूर तथा आर्थिक हितसंबंध जोपासल्या प्रकरणी देसाईगंज तहसीलदार प्रिती डूडूलकर,मंडळ अधिकारी के.पी.ठाकरे व तत्कालीन तलाठी अर्चना टीचकुले यांचेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्ते तक्रारदार नामदेव वसाके व सत्यवान रामटेके यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी...

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!