Tuesday, July 21, 2026
Homeभंडाराअवैध रेती भरलेल्या ट्रॅक्टरने उडवले; २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू..!

अवैध रेती भरलेल्या ट्रॅक्टरने उडवले; २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात रेती घाट बंद असतांनाही अवैध गौण खनिजांची चोरी होत असल्याचा प्रकार एका अपघाताने उघडकीस आला आहे.पहाटेच्या सुमारास कामाहून सायकलने परत जाणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणास अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टॅक्टरने धडक देत जिवानिशी ठार केल्याची घटना तुमसर तालुक्यातील तुमसर-कटंगी महामार्गावरील साखळी-मिटेवानी मार्गावर काल रविवारी सकाळच्या सुमारास घडली.यात अनिल साहरु बागडे वय २८ वर्षे,रा.साखळी, ता.तुमसर,जि.भंडारा असे जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव असून मयत अनिल मिळेल ते काम करून संसाराचा गाडा हाकत होता.त्यातच तो कुटुंबात एकुलता-एक कमावता असल्याने कुटूंबीय उघड्यावर आले आहे.
त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील,पत्नी व तीन वर्षाची मुलगी आहे.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती तुमसर पोलिसांना दिली. सकाळची घटना असल्याने ट्रॅक्टरचालक रेतीने भरलेला ट्रॅक्टर सुसाट वेगाने चालवीत पळून गेला.परिसरातील नागरिकांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला.तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!