Friday, September 4, 2026
Homeब्रम्हपुरीवाघाने घेतला शेतकऱ्याच्या नरडीचा घोट; ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना..

वाघाने घेतला शेतकऱ्याच्या नरडीचा घोट; ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा वाघाने नरडीचा घोट घेत ठार केल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार १० नोव्हेंबर रोजी मेंडकी गावनजिकच्या जवराबोडी मेंढा जंगल परिसरात उघडकीस आली.भास्कर गोविंदा गजभिये वय ६० वर्षे रा.मेंडकी,ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून भास्कर हे काल रविवारी शेतातील धानाचे भारे बांधण्यासाठी मेंडकीपासून जवळ असलेल्या जवराबोडी-मेंढा जंगल परिसरात सिंदी तोडण्यासाठी एकटेच गेले होते. कालपासून त्यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने कुटूंबीय तसेच ग्रामस्थांनी वन विभागास माहिती देत शोध घेतला असता आज सोमवारी भास्कर यांचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला.प्रकरणी वनविभागाचे अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी रुग्णालयात पाठवला.घटनेने परिसरात भीती पसरली असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!