Saturday, September 5, 2026
Homeनागपूरकमी किंमतीत कार आणि दुचाकी मिळवून देण्याचे आमिष; पंधराहून अधिक ग्राहकांना चुना..!

कमी किंमतीत कार आणि दुचाकी मिळवून देण्याचे आमिष; पंधराहून अधिक ग्राहकांना चुना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- एका टोळीने कमी किंमतीत कार आणि बाइक मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल पंधराहून अधिक ग्राहकांना चुना २९ लाख ८८ हजार रुपयांना चुना लावल्याची घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.प्रकरणी आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून मो.सर्फराज व मो.शकील याला अटक करण्यात आली आहे.२९ वर्षीय रजा रियाजखान पठाण रा.लाकडीपूल,कोतवाली असे तक्रारदाराचे नाव असून त्याची नातेवाइकांच्या माध्यमातून गंगाबाई घाट मार्गावरील एमएच मोटर्सचा मालक फिरोज हमीद खान पठाण वय ३० वर्षे, सुभाननगर याच्यासोबत भेट झाली.फिरोजने हसनबाग येथील ३५ वर्षीय वहीद आलम,तसेच शहीदनगर,रनाळा, कामठी येथील २५ वर्षीय मो.सर्फराज मो.शकील व जय कुखे वय ३३ वर्षे,कॉटन मार्केट यांच्यासोबत मिळून १० एप्रिल २०२३ ते १० ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत आरोपींनी रजाकडून साडेसात लाख रुपये उकळले; मात्र कुठलीही गाडी दिली नाही.त्याचबरोबर,रजाने चौकशी केली असता आरोपींनी अशाच प्रकारे १५ हून अधिक जणांकडून २९ लाख ८८ हजार रुपये घेतले होते.त्यांनी वाहनांची खोटी कागदपत्रे बनविली व बँकेत कमी डाऊन पेमेंट भरून ग्राहकांकडून जास्त रक्कम घेतली.सदरचा प्रकार समोर येताच रजाने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.प्रकरणी लकडगंज पोलिसांनी दोघांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!