Friday, September 11, 2026
Homeभंडाराअवैध रेती तस्करी; तीन रेती चोरट्यांकडून १० लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त...

अवैध रेती तस्करी; तीन रेती चोरट्यांकडून १० लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-विनापरवाना रेती ट्रॅक्टरमध्ये भरून वाहतूक करणाऱ्यांवर तीन ठिकाणी कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहिल्या कारवाईत,तुमसर पोलिसांनी तामसवाडी वैनगंगा नदी पात्रात कारवाई करून ८ लाख १ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.आरोपी चालक चंद्रमोहन यादव बनकर वय ४५ वर्षे याने मालक राजू वासुदेव बनकर वय ५२ वर्षे,रा.डोंगरला याच्या सांगण्यावरून तामसवाडी वैनगंगा नदी पात्रातून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये रेती भरताना मिळून आला.ही रेती तिसरा आरोपी खेमराज बाळकृष्ण रहांगडाले वय ४० वर्षे,रा.डोंगरला याच्याकडे साठवणुकीकरिता नेत होता.पोलिसांनी ट्रॅक्टर व एक ब्रास रेती असा ८ लाख १ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.तुमसर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दुसऱ्या कारवाईत,बेलगाव शेतशिवार रेती घाटाकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर निलेश लालचंद राघोर्ते वय २१ वर्षे रा.सुरेवाडा व मालक रोहीत दिलीप मारवाडे रा.खमारी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैधरित्या रेती चोरी करताना मिळून आले.तर एमएच-३६/एल-६०९९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अर्धा ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले.कारधा पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर व दीड ब्रास रेती व असा १० लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!