Sunday, April 19, 2026
Homeभंडाराअल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून अत्याचार; नंतर ब्लॅकमेल करून पैश्याची मागणी.. - १९...

अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून अत्याचार; नंतर ब्लॅकमेल करून पैश्याची मागणी.. – १९ वर्षीय युवक बिन भाड्याच्या खोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अल्पवयीन मुली प्रेमाच्या जाळ्यात सहजपणे अडकू लागल्याने याचा फायदा घेणाऱ्यांची संख्या कमी नाही.एखादा मुलगा वा व्यक्ती जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत असतांनाच चपलेने मारीन, नाहीतर पोलिसांत तक्रार दाखल करेन वा त्रास देणाऱ्याची माहिती लगेच घरच्यांना दिली तर कुणाचीही मागे लागण्याची हिंमत होणार नाही.पण आम्ही स्वतःच गप्प राहून इतरांचे त्रास सहन करून बघ्याची भूमिका घेतो.त्यामुळे हल्ली अत्याचार वा इतर प्रकार घडतांना दिसून येतात.अश्यातच एका १९ वर्षीय युवकाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याने तक्रारीअंती युवक बिन भाड्याच्या खोलीत गेला आहे.वेदांत मते वय १९ वर्षे,बोथली,वरठी,जि.भंडारा असे अत्याचार करणाऱ्या आरोपी युवकाचे नाव आहे.युवकाला मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.२७ एप्रिल रोजी शहापूर येथे पीडित मुलीवर शारीरिक अत्याचार केला.अल्पवयीन पीडित मुलगी ही विद्यानगर येथे शिक्षण घेत असून वेदांत याने तिच्याशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला.त्यानंतर इंस्टाग्रामवर खासगी फोटो पाठवण्यास भाग पाडले.खासगी फोटो पाठविल्यानंतर आरोपी युवकास पैश्याची गरज भासली असता,त्याने अल्पवयीन मुलीला पैश्याची मागणी केली.मुलीने पैसे देण्यास नकार देताच ब्लॅकमेल करून खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.त्यामुळे मुलगी घाबरली व घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.त्यानुसार भंडारा पोलीस ठाणे गाठून युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली.प्रकरणी युवकावर भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!