Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरअबब....!बदली होताच; कार्यालयातील इतर साहित्त्या सोबतच चक्क टॉयलेटचा दरवाजाही गेला घेऊन - चंद्रपूर...

अबब….!बदली होताच; कार्यालयातील इतर साहित्त्या सोबतच चक्क टॉयलेटचा दरवाजाही गेला घेऊन – चंद्रपूर येथील अधिकाऱ्याचा कारनामा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर: – येथील स्थानिक गुन्हे शाखेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा कारनामा पाहून सर्वचजण चक्रावून गेले आहेत.चंद्रपुरात अडीच वर्षे स्थानिक गुन्हे शाखेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बदली मानव संसाधन विभागात झाली.अडीच वर्षात या अधिकाऱ्याने स्वतःच्या सोयी सुविधांसाठी काही वस्तू खरेदी केल्या होत्या.बदली झाल्यानंतर अधिकाऱ्याने काही वस्तू सोबत नेल्याच; मात्र चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातील खुर्ची-टेबल,एसी,पडदे आणि दिवे अशा सर्व गोष्टी आपल्यासोबत नेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.नवलाची बाब म्हणजे या अधिकाऱ्याने चक्क केबिनमधील टॉयलेटला लावलेला दरवाजाही सोबत घेऊन गेला. अनेक शासकीय कर्मचारी सहकाऱ्यांना, गावकऱ्यांना काहीना काही भेटवस्तू देऊन जातात.मात्र या अधिकाऱ्याची कृती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

सगळ्या प्रकाराची राज्यभरात चर्चा रंगल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने आपली बाजू मांडली आहे.’मी ज्या वस्तू सोबत नेल्या; त्या माझ्या कमाईच्या होत्या.मी कुणाच्या बापजाद्याची वस्तू सोबत नेलेली नाही; असे पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!