Tuesday, October 27, 2026
Homeभंडाराअन् रेतीचा अडविलेला टिप्पर बघता-बघता डुप्लिकेट चावी लावून चालक झाला पसार..

अन् रेतीचा अडविलेला टिप्पर बघता-बघता डुप्लिकेट चावी लावून चालक झाला पसार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रेती चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.रेतीची चोरी रात्री तर केलीच जात आहे; पण,आता दिवसाढवळ्याही बिनधास्तपणे रेतीची चोरी करून वाहतूक केली जात असल्याने चोरांचे साथीदार तयार झाल्याचे चित्र सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.अशातच भंडारा जिल्ह्यातील रेती चोरीवर अंकुश मिळविण्यासाठी महसूल विभागातील यंत्रणा कामी लागली असली तरी चोरटे मात्र अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन कसे पळ काढतात,याचा एक वेगळा नमुना मोहगाव देवी रेती डेपोच्या मार्गावर कर्तव्यावर असणाऱ्या तलाठ्याला आला.
सरस्वता झाडे या मोहाडी तहसिल कार्यालयाअंतर्गत मोहगाव देवी येथे अतिरिक्त प्रभारी तलाठी म्हणून कार्यरत आहेत.मोहगाव देवी डेपोकडे जाणाऱ्या कमानीजवळ २३ सप्टेंबरच्या दुपारी १२:४० वाजताच्या दरम्यान त्यांनी कार्यालयासमोरून रेती घेऊन जाणारा १० चाकी टिप्पर क्रमांक-
एमएच-३६,३४४५ थांबविला आणि चौकशी केली. त्यात २० हजार रुपये किंमतीची सुमारे ५ ब्रॉस रेती  भरलेली आढळली.त्यासंदर्भात चौकशी केली असता चालकाकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती.चालक राहूल मडावी याने,आपण मालकाच्या सांगण्यावरुन या रेतीची वाहतूक करीत असल्याचे त्याने सांगितले. या कारवाईदरम्यान टिप्परची चावी आणि कागदपत्रे ताब्यात घेऊन तलाठी चौकशी करीत असतानाच, संबंधित वाहनचालकाने आपल्याजवळी डुप्लिकेट चावी लावून टिप्पर सुरू केला.तो रिव्हर्स घेऊन रेती आणि टिप्परसह पळ काढला.मात्र तलाठी काहीच करू शकले नाही.या प्रकरणी वरठी पोलिसात तलाठ्याने तक्रार नोंदविली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२),२८१,२२१,२६२,२३८,४९ सहकलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!