Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरअन् बहिणीची भेट राहिली अधुरीच; वाटेतच झाला अपघात.. - एकजण ठार तर...

अन् बहिणीची भेट राहिली अधुरीच; वाटेतच झाला अपघात.. – एकजण ठार तर एक जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-बल्लारपूर शहरातील पेपर मीलच्या सातव्या गेटसमोर एका हायवा ट्रकने दुचाकीला उडविल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना काल,गुरुवारी २६ सप्टेंबरच्या दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.गोलू उर्फ भूषण उमरगुंडावार वय २२ वर्षे,रा.घोडपेठ,असे मृतकाचे नाव आहे.
सतीश लोखंडे वय ३४ वर्षे,रा.घुग्घुस हा गंभीर जखमी असून,बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.गोलू उमरगुंडावार व सतीश लोखंडे हे दोघे एमएच ३४ एडब्ल्यू ६१०७ क्रमांकाच्या दुचाकीने बल्लारपूरकडे जात होते.मागून येणाऱ्या हायवा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.यात गोलू उमरगुंडावार हा जागीच ठार झाला तर सतीश लोखंडे हा गंभीर जखमी झाल्याने बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
गोलू उमरगुंडावार हा दुर्गापूर येथे पानठेल्यावर काम करीत होता.काल,गुरुवारी त्याने पानठेला मालकाची दुचाकी घेतली.बल्लारपूर येथे बहिणीला भेटून येतो म्हणून घुग्घूस येथील मित्र सतीश लोखंडे याला घेऊन बल्लारपूरकडे निघाला.परंतू,बल्लारपूरच्या सीमेवर हा अपघात घडला व बहिणीची भेट अधुरी राहिली. बल्लारपूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पेपर मील गेट क्रमांक सात जवळील सीसीटीव्ही तपासले. धडक देणारा ट्रक सुरजागडकडे गेल्याचा पत्ता लागला.तेव्हा पोलिस उपनिरीक्षक यांनी चमुसह आलापल्ली गाठून ट्रकचा शोध लावला.घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!