- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपुरात एका सुरक्षा रक्षकाने टोकाचे पाऊल उचलत आवडाव पाहून चक्क उड्डाणपुलावरून उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे.उडी घेताच मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठेकाच चुकला.यशवंत रमेश शाहू वय ३१ वर्षे,कुकरेजा नगर,जरीपटका, नागपूर असे मृतक सुरक्षारक्षकाचे नाव आहे.तो मेस्को’ मध्ये सुरक्षारक्षक हणून कार्यरत होता.दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोराडीहून सदरच्या दिशेने निघाला होता.पागलखाना चौकाजवळ त्याने गाडी थांबविली व हेल्मेट काढून तो उड्डाणपुला जवळ जाऊन उभा झाला.बराच वेळ तो तेथे उभा होता आणि आवडाव पाहून अचानक त्याने रेलिंगवर चढून खाली उडी मारली.मार्गावरील वाहनचालकांनी वाहने थांबविली व बघितले असता यशवंत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.मानकापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठत त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,तोपर्यंत यशवंतची प्राणज्योत मावळली होती.सुरक्षा रक्षक असलेल्या यशवंत ने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले?अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
- Advertisement -

