Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूरअन् कर्तव्य बजावत असतांनाच गेले बियर शॉपीमध्ये....- थंडी बियर पिणे दोन पोलिसांना...

अन् कर्तव्य बजावत असतांनाच गेले बियर शॉपीमध्ये….- थंडी बियर पिणे दोन पोलिसांना पडले महागात…- ब्रम्हपुरी येथील प्रकरण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीसाठी १५ दिवसांपूर्वी विविध संघटनांच्या वतीने ब्रम्हपुरी येथे आंदोलन करण्यात आले होते.त्यानुसार पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्ता करीता अनेक पोलिसांच्या ड्युटी लावण्यात आल्या होत्या. अशातच एकीकडे आंदोलन सुरू असतांनाच; उन्हाच्या तडाख्यामुळे वा इतर कारणांमुळे दोन पोलीस कर्मचारी वर्दिवरच असतांना बियर पिण्याचा त्यांना मोह आवरला गेला नसावा; त्यामुळेच एका बियर शॉपीमध्ये गेले व दारूचा मनसोक्त आनंद लुटीत होते.अशातच ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांना सदर प्रकाराची माहिती मिळताच; तिघेजण वर्दिवरच बियर बार मध्ये दिसून आल्याने सदर प्रकरणाची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक परदेशी यांना दिली.त्यानुसार संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पोलीस कर्मचारी उमेश मस्के व नरेश निमगडे यांना निलंबित करण्यात आले आहे.तिसरा व्यक्ती दारू पीत नसल्याने कारवाई करण्यात आली नसल्याचे कळते.

कर्तव्य बजावत असतांना दारू ढोसण्याचा हल्ली प्रकार देसाईगंज,आरमोरी व इतरही तालुक्यात सुरू असून शासकीय अधिकारी,कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी साईटवर जाण्याच्या बहाण्याने वा इतर कारणे समोर करून कार्यालयाची सुट्टी होण्यापूर्वीच बार मध्ये व इतर ठिकाणी दारूच्या अड्ड्यांवर तासनं-तास दारू ढोसून गप्पा-गोष्टीत रंगत असल्याचा प्रकार निदर्शनास येऊ लागला आहे.अशांची बार मधील सीसीटिव्ही फुटेज तपासल्या गेली तर सर्वांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही.अशांवर त्वरित आळा घातला जावा; अन्यथा ‘शासकीय काम व थोडे दिवस थांब’ अशी सर्वसामान्य जनतेची गळचेपी झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!