- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-धावत्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेला ट्रक पुलावरून थेट खाली कन्हान नदीच्या पात्रात कोसळून अपघातात ट्रकचालकासह एकजण गंभीर जखमी झाला.सदरची घटना सावनेर तालुक्याच्या खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव-खापा मार्गावरील कन्हान नदीच्या पुलावर पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली.पवन सूर्यवंशी वय ३५ वर्षे व विजय धुर्वे वय २५ वर्षे दोघेही रा.बिचवा,जि.छिंदवाडा, मध्य प्रदेश अशी गंभीर जखमींची नावे असून दोघेही एमपी २८ जी ३७५४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये मक्याची पोती घेऊन छिंदवाडा बिचवा येथून सावनेर तालुक्याच्या बडेगाव,खापा, पाटणसावंगी मार्गे नागपूरला जात होता. हा ट्रक बडेगाव-खापा दरम्यानच्या कन्हान नदीवरील पुलावर पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेला ट्रक अनियंत्रित होऊन पुलावरून थेट खाली नदीच्या पात्रात कोसळला.ट्रकमधील दोघांना गंभीर दुखापत झाली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला.त्यांनी हितेश बन्सोड यांच्या मदतीने ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या दोन्ही जखमींना बाहेर काढून खापा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्रथमोपचार केल्यानंतर हितेश बन्सोड यांनी दोघांनाही नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले.याप्रकरणी खापा पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.ट्रक पुलावर पोहोचताच चालकास झोपेची डुलकी आली असावी आणि त्याचा ताबा सुटून ट्रक पुलावरून खाली कोसळला असावा,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

