Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीआमदार रामदास मसरामांच्या प्रयत्नातून कोरची येथे होणार नवे शासकीय विश्रामगृह.. - विश्रामगृहास...

आमदार रामदास मसरामांच्या प्रयत्नातून कोरची येथे होणार नवे शासकीय विश्रामगृह.. – विश्रामगृहास २ कोटी ५७ लाखाचा निधी मंजूर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात वसलेल्या कोरची तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम सातत्याने पाठपुरावा करत असून त्यांच्या ठोस प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.आमदार मसराम यांच्या प्रयत्नातून कोरची येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा नवीन शासकीय विश्रामगृहाच्या बांधकामासाठी शासनाने तब्बल २ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.कोरची तालुका हा आदिवासी व दुर्गम भागात येत असल्याने प्रशासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे कर्मचारी यांना वास्तव्याच्या सुविधांचा अभाव जाणवत होता.ही बाब लक्षात घेता आमदार रामदास मसराम यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा महत्त्वाचा विकासात्मक प्रस्ताव मंजूर झाला आहे.
या विश्रामगृहामुळे तालुक्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होणार असून नागरिकांच्या प्रश्नांना वेळेत न्याय मिळण्यास मदत होणार आहे.त्याचबरोबर, बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांना सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध होणार असल्याने कोरची तालुक्याच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे.या निधी मंजुरीबद्दल कोरची तालुक्यातील नागरिक,सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी आमदार रामदास मसराम यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहे. विकासासाठी कटिबद्ध असलेले आमदार रामदास मसराम यांचे नेतृत्व कोरची तालुक्यासाठी निश्चितच लाभदायक ठरत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!