Saturday, August 1, 2026
Homeनागपूरअनियंत्रित ट्रक नदी पात्रात कोसळला; दोघेजण गंभीर जखमी..

अनियंत्रित ट्रक नदी पात्रात कोसळला; दोघेजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-धावत्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेला ट्रक पुलावरून थेट खाली कन्हान नदीच्या पात्रात कोसळून अपघातात ट्रकचालकासह  एकजण गंभीर जखमी झाला.सदरची घटना सावनेर तालुक्याच्या खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव-खापा मार्गावरील कन्हान नदीच्या पुलावर पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली.पवन सूर्यवंशी वय ३५ वर्षे व विजय धुर्वे वय २५ वर्षे दोघेही रा.बिचवा,जि.छिंदवाडा, मध्य प्रदेश अशी गंभीर जखमींची नावे असून दोघेही एमपी २८ जी ३७५४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये मक्याची पोती घेऊन छिंदवाडा बिचवा येथून सावनेर तालुक्याच्या बडेगाव,खापा, पाटणसावंगी मार्गे नागपूरला जात होता. हा ट्रक बडेगाव-खापा दरम्यानच्या कन्हान नदीवरील पुलावर पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेला ट्रक अनियंत्रित होऊन पुलावरून थेट खाली नदीच्या पात्रात कोसळला.ट्रकमधील दोघांना गंभीर दुखापत झाली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला.त्यांनी हितेश बन्सोड यांच्या मदतीने ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या दोन्ही जखमींना बाहेर काढून खापा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून  प्रथमोपचार केल्यानंतर हितेश बन्सोड यांनी दोघांनाही नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले.याप्रकरणी खापा पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.ट्रक पुलावर पोहोचताच चालकास झोपेची डुलकी आली असावी आणि त्याचा ताबा सुटून ट्रक पुलावरून खाली कोसळला असावा,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!