Friday, May 1, 2026
Homeपुणेअत्यंत घृणास्पद...!जादूटोण्यासाठी महिलेच्या मासिक पाळीची ५० हजाराला विक्री- राज्य महिला आयोगाने घेतली...

अत्यंत घृणास्पद…!जादूटोण्यासाठी महिलेच्या मासिक पाळीची ५० हजाराला विक्री- राज्य महिला आयोगाने घेतली दखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

पुणे :- पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील सुनेवर बळजबरी करुन मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटाेण्यासाठी ५० हजाराला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सदरचा प्रकार अतिशय घृणास्पद असून विकृत मानसिकता असणाऱ्या आराेपींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.याप्रकरणाची राज्य महिला आयाेगाने दखल घेतल्याची माहिती राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

चाकणकर यांनी म्हटले की,राज्य महिला आयाेग या केसच्या संबंधितांना निर्देश देईलच परंतु पुण्यासारख्या शहरात अजूनही अंधश्रध्देला बळी पडणारी कुटुंबे आहे ही दुर्देवी बाब आहे. दाेनच दिवसांपूर्वी जागतिक महिला दिन साजरा करत आपण सर्वांनीच स्त्री शक्तीचा सन्मान केला. परंतुआज घृणास्पद घटनेत महिलेवर झालेला अत्याचार पाहून अजून किती आणि कसा लढा बाकी आहे असा प्रश्न पडताे.पुणे हे विद्येचे माहेरघर असून अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या घटना चुकीच्या आहे.अशाप्रकारच्या घटना पाहता महिलां बाबत अत्याचाराच्या घटना कितपत रुजलेल्या दिसून येते.असे प्रकार राेखण्यासाठी राज्य महिला आयाेग जागरुकता कार्यक्रम सातत्याने राबवत आहे.

काैटुंबिक वादातून २७ वर्षीय पत्नी साेबत अघाेरी कृत्य करुन तसेच तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह सात जणांवर विश्रांतवाडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पाेलीसांनी आराेपींच्या विरुध्द अनैसर्गिक कृत्य,विनयभंग व शारिरिक व मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघाेरी प्रथा जादुटाेणा प्रतिबंध अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे.विवाहनंतर पिडित महिला बीड जिल्हयातील एका गावात पतीच्या घरी राहत हाेती.त्यावेळी मासिक पाळी दरम्यान कापसाने तिचे रक्त काढून जादुटाेणा करिता त्याची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!